प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणम्हणजे ६ ते १४
वयोगटातील सर्व मुलांना शाळेत आणणे, सर्व मुलांना वयाच्या १४ वर्षापर्यंत
शाळेत टिकविणे आणि सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण देणे होय.
प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम या संस्थेने महाराष्ट्रात
खेडोपाडी, गरीबवस्तीत बालवाड्या उघडून सर्व मुलांना व्यवस्थितरित्या शिक्षण
देते. एका वर्गात २० ते २५ विद्यार्थी संख्या असून आदिवासी भागात देखील या
बालवाड्या चालू असतात. कोणत्याही जातीचा, भाषेचा, मुलगा वा मुलगी असो ते
या शाळेत आलेच पाहिजे यासाठी संस्था प्रयत्नशील असते.
बालवाडीचे प्रशिक्षण ६ महिन्यांचे असून त्याचे
प्रशिक्षण शुल्क रु.१,५००/-आहे . ज्या शिक्षकांनी बालवाडीचे प्रशिक्षण
घेतलेले असते. ते शिक्षक आजूबाजूच्या परिसरात बालवाड्या सुरु करू शकतात.
अशा प्रकारे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण समाजाच्या सर्व स्थरातील लोकांना
उपलब्ध होऊ शकते.
No comments:
Post a Comment