Thursday, 6 June 2013

नोकरीचा शोध

नोकरीचा शोध

नोकरीचा शोध
नोकरी म्हणजे उदरनिर्वाहाचे साधन होय. शैक्षणिक पायरी ओलांडल्यानंतर प्रवास सुरु होतो तो नोकरी शोधण्याचा... माहिती तंत्रज्ञानाने नोकरीच्या संधी विविध क्षेत्रात वाढल्या आहेत. पूर्वी नोकरी शोधण्यासाठी मर्यादित साधने होती. परंतू आता नोकरीच्या कक्षा जगभर पसरल्या आहेत. प्रश्न उरतो तो फक्त आपण त्यापर्यंत पोहचण्याचा.
आपले ध्येय निश्चित असले तर नोकरी आपल्यापर्यंत पोहचते, फक्त आपण त्यासाठी कष्ट घेतले पाहिजे. संगणक आणि इंटरनेटने जग जवळ आले आहे. याचा प्रत्येक व्यक्तीने वापर केला पाहिजे. नोकरी देणा-या  ब-याच कंपन्या आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यांच्या संकेतस्थळांवर नोकरीविषयी माहिती उपलब्ध असते. वर्तमानपत्रातील जाहिरातीकडेसुद्धा आपण लक्ष दिले पाहिजे. विविध संस्था, पक्ष, सामाजिक संघटना नोकरीसंदर्भात मार्गदर्शन करतात.
मनुष्य बळ (ह्युमन रिसोर्स) एच.आर. कंपन्या महविद्यालयातून नोकरीसाठी विद्यार्थी निवडतात आणि त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ते विद्यार्थी नोकरीवर रुजू होतात. नोकरीसाठी  अर्ज करताना कंपनीची माहिती घेणे आवश्यक आहे, स्व-परिचय पत्र (बायो-डेटा) कसा असावा याचे ज्ञान घेणे, मुलाखत कशी द्यावी याचे अनुभव व्यक्तींना विचारावे, स्वतःचे सादरीकरण, आत्मविश्वास , मुलाखतीला जाताना करावयाचा अभ्यास अशा अनेक बाबी समजावून घ्याव्यात. यामुळे मुलाखत देताना सामाजिक दडपण येत नाही. जवळच्या नातेवाईकांचे संबंध आणि मित्र-मैत्रिणींकडून नोकरीसंदर्भातील मार्गदर्शन मोलाचे ठरते. अशा प्रकारे नोकरीचा शोध घेतल्यास आपल्याला अडचणी येत नाहीत आणि नोकरीवर रुजू होण्याचा मार्ग मोकळा होतो.

 ......................................................................................................................................................................

काय सादर करायचे आहे

सादर करणे याचा अर्थ समोर ठेवणे. त्यामुळे ते आकर्षक, नीट नेटके असायला हवे. ज्याच्या समोर सादर करणार त्याला समजेल अशा भाषेत सादरीकरण असायला हवे. जो विषय सादर करावयाचा  असतो त्यात सगळ्यात महत्वाचा असा जो भाग असतो तो मध्यवर्ती असायला हवा. सादर  करणाऱ्या माणसाचा हेतू मुळात तो मुख्य विषय व त्याच बरोबर त्या विषयाची अधिक माहिती लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवणे हा असावा. माहिती, संभाषण आणि लेखन या गोष्टी सादरीकरणात महत्वाची भूमिका बजावतात.

विषयाची माहिती : माहिती सादर करणाऱ्याला सादरीकरणातील विषय व्यवस्थितपणे माहिती असणे गरजेचे असते. त्या विषयातील महत्वाच्या गोष्टी,  त्यातील बारकावे इ. माहिती असायला हवी. ही माहिती सादरकर्त्याला अर्धवट असल्यास ज्यांच्या समोर तो विषय सादर केला जात आहे त्यांची दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे सादरीकरणाचे हेतू साध्य होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो किंवां त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ शकते.
संभाषण : संभाषण म्हणजे चांगला संवाद करणे होय. सादर करणाऱ्या माणसाला सोपे आणि सुलभ बोलणे जमले पाहिजे. त्यामुळे लोकांचे प्रश्न आणि शंका सोडवणे सोपे होते. प्रभावी संभाषणाने सकारात्मक वातावरण तयार होते. त्याचप्रमाणे अंतीम हेतूही साध्य होतो. 
सादरीकरण हा फक्त एका बाजूचा संवाद  नसल्यामुळे सादरीकरण संपल्यावर प्रेक्षक आणि श्रोते त्यांच्या मनातील प्रश्न सादरकर्त्याला विचारू शकतात आणि त्या प्रश्नांची सादरकर्त्या व्यक्तीने उत्तरे देणे गरजेचे असते. त्यामुळे मिळालेली माहिती केवळ पाठ करून बोलून दाखवण्याची शक्कल येथे हमखास फसतेच. सादरीकरण करताना सादरकर्त्याला तो सादर करत असलेला विषयाचा अभ्यास आणि पूर्ण माहिती असायलाच हवी. त्यामुळे दिलेल्या विषयावरील शक्य तेवढी माहिती गोळा करणे, त्या माहितीचा वेगवेगळ्या बाजूने विचार करणे, त्यातून स्वतःला पटेल असा एक विचार तयार करणे ही सादरकर्त्याची कामे  आहेत. 
लिखाण : सादरीकरणाचे लेखन हे सोपे असावे. यामध्ये सादरीकरणाच्या वेळी नक्की काय बोलायचे आहे, कोणकोणते मुद्दे मांडायचे आहेत, त्यासाठी कोणकोणती उदाहरणे द्यायची आहेत, इ. गोष्टी  सादरकर्त्याला चांगली माहिती असणे जास्त गरजेचे असते. त्यामुळे एका छोट्याशा कागदावर काय बोलायचे आहे त्याची मुद्देसूद मांडणी केलेली असेल तरी पुरेसे आहे. सादरीकरणातील महत्वाची असलेली माहिती ही लिखाणातून लोकांपर्यंत पोहोचणार असल्या कारणाने लिखाण ही सुद्धा सादरीकरणातील एक महत्वाची गोष्ट आहे.


.......................................................................................................................................................................


नवीन नोकरी सुरु करताना

वाहतुकीची माहिती मिळवा
कामावर जाण्या येण्याच्या प्रवासाची योजना आखणे अत्यंत आवश्यक आहे. या संबधी टिप्स साठी काही साईटसचा वापर करा. 
पाळणाघराविषयी माहिती मिळवा
पाळणाघराविषयी माहिती मिळवण्यासाठी साईटसचा वापर करा.
कामगारांची नियमावली वाचा
कामाला सुरुवात करण्यापूर्वी तेथील नियम, कोणते कपडे (गणवेष) घालावेत, वार्षिक किती सुटटया रजा मिळतात याची माहिती करून घ्या.
कामगारांच्या आरोग्य विषयक योजना, पेंशन योजना, प्रॉव्हीडट फंड, यामध्ये सहभागी व्हा. साधारणपणे आरोग्य विषयक योजना सुरु होण्यास ३० ते ९० दिवस जातात. तेव्हा कंपनीच्या योजनेत (पात्र ठरत असल्यास) लवकरात लवकर सहभागी व्हा.
कपडे (गणवेष) विकत घ्या
कामावर घालण्याच्या पोशाखाविषयी अधिक माहिती करून घ्या.


........................................................................................................................................................................


नेटवर्किंग

“नेटवर्किंग” म्हणजे एक आकर्षक शब्द आहे जो नोकरी मिळवण्यासाठी आपण परिचयाच्या लोकांकडे बोलतो. स्वतःचे असे एक नेटवर्क असतेच; गरज असते ती फक्त त्यात कोण आहेत हे बघण्याची आणि त्यांचा संदर्भ मिळवण्याची. उत्तम नेटवर्क तयार करण्यासाठी काही टिप्स, त्यासाठी काही स्टेप्स (पाया-या) आहेत:
पायरी एक : नेटवर्कची यादी तयार करण्याची:
तुमच्या प्रत्येक मित्राची, कुटुंबातील व्यक्तींची किंवा नोकरीसाठी मदत करू शकतील अशा प्रत्येक व्यक्तीची नवे, फोन क्रमांक व राहण्याचा पत्ता (असल्यास) लिहा.
पायरी दोन: महत्त्वाच्या व्यक्तींची निवड करा:
या यादीत अशा व्यक्तींची नावे लिहा जे तुम्हाला नोकरीसाठी मदत करू शकतील. उदाहरणार्थ, असा एखादा व्यक्ती जो तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात नोकरी करत असेल किंवा असा एखादा मित्र किंवा मैत्रीण जे ब-याच लोकांना ओळखत असतील.
पायरी तीन: नेटवर्कमधील व्यक्तींना फोन करण्यास सुरु करा:
जेव्हा तुम्ही फोनवर बोलता त्यावेळी अशा प्रकारे बोलावे: हॅलो, प्रिया मी निशा बोलतेय, पार्कातील मैत्रीण. मी आत्ताच माझा कॉम्प्यूटर कोर्स पूर्ण केला आहे आणि आता मी नोकरी शोधतेय. मला माहित होते की तू पण याच क्षेत्रात काम करतेस तर नोकरी मिळविण्यासाठी मला काही मदत करू शकशील?”
टीप: तुमचे कौशल्य व अनुभवाबद्दल सविस्तर बोला. जर तुमच्या नेटवर्कमधील लोकांना हे माहीतच नसेल की तुम्ही काय केलं आणि काय करण्याची तुमची इच्छा किंवा तयारी आहे तर तुम्हाला मदत करणे त्यांना कठीण होईल.
पायरी चार: तुमच्याकडे दुसरे नाव मिळेपर्यंत फोन ठेऊ नका:
जर त्या व्यक्ती तुमच्या नोकरीसाठी तुम्हाला मदत करू शकत नसतील तर ते अशा काही लोकांना ओळखत असतील जे तुम्हाला मदत करू शकतील. त्यांच्या ओळखीत जर तुम्ही कोणाला फोन करणार असाल तर तुम्ही अशा प्रकारे बोलावे:
“हॅलो, मिस्टर बागवे? राजेश कदम यांनी मला तुमचे नाव सुचवले होते. आम्ही एकाच ठिकाणी राहतो. मी कदम यांना माझ्या नोकरीसाठी बोललो होतो. मला कम्पुटर क्षेत्रामध्ये नोकरी हवी आहे तर कदम म्हणाले की तुमच्या या क्षेत्रात ओळखी आहेत व तुम्ही मला मार्गदर्शन करू शकाल.”
पायरी पाच : नंतर तुमचा बायो डेटा (स्वपरिचय पत्र) पाठवा: 
तुमच्या बायो डेटाच्या प्रति काढा व तुमच्या नेटवर्कमधील व त्यांनी दिलेल्या ओळखीतील व्यक्तींना त्या पाठवा. त्यासोबत एखादा आभाराचे पत्र ही जोडा ज्यात तुम्ही त्याना मदत करण्याबद्दल आणि पुन्हा एकदा तुमच्या विषयी माहिती व आवड कळवू शकता. जर तुमच्याकडे बायो डेटा नसेल, तर तो तयार करण्यासाठी अनेक साईटस आहेत त्यांचा उपयोग करा.
जर या काही पाय-यानुसार नोकरी शोधली तर तुम्हालाही कळणार नाही की तुमचे नेटवर्क कशा प्रकारे वाढेल. 

.................................................................................................................................................................................................


नोकरी विषयी माहितीचा शोध

नोकरी शोधताना या गोष्टीचा खूप फायदा होतो, जेंव्हा तुम्ही नोकरीच्या शोधात असता तेंव्हा येणा-या प्रत्येक  संधीचा फायदा करून घेतला पाहिजे, आणि त्यासाठी प्रत्येक वाट आपण स्वतः जोखून पहिली पाहिजे म्हणूनच नोकरीच्या संधी शोधताना ज्या ज्या माध्यमांचा वापर करता येईल ते करून नोकरी शोधायला पाहिजे .
आवश्यक गोष्टी
स्थानिक वृत्तपत्राद्वारे नोकरी विषयी माहिती शोधताना सुरवातीला तुमच्याकडे येणा-या  लोकल वृत्तपत्रातून स्थानिक नोकरीच्या जाहिरातींद्वारे तुमच्या आवडीची नोकरी शोधू शकता. आजकाल अनेक वृतपत्र हे नोकरी विषयी जाहिरातींसाठी वेगळ्या पुरवण्याही देतात त्यात तुमच्या गुणवत्तेला साजेशी नोकरी तुम्ही शोधू शकता. खरे तर हे नोकरी शोधणेही   सर्वात सोपे मध्यम आहे आणि हे वृत्तपत्र स्थानिकच असल्यामूळे ते नोकरी विषयीच्या सर्व जाहिराती शक्यतो स्थानिक पातळीच्या वर छापतात त्यामुळे मुलाखतीसाठी तुम्हाला इतर ठिकाणी जाण्याचीही गरज नसते.
इंटरनेट द्वारे
नोकरी विषयी ची माहिती तुम्ही इंटरनेट वर ही शोधू शकतात. आजकाल ब-याच नोकरी विषयी साईट्स च्या माध्यमातून ही सोय केलेली आहे. तुम्ही गुगल सारख्या साईट्स वर शिक्षण असा की वर्ड टाईप केलात आणि सर्च केले तर तुमच्या शिक्षणाशी संबंधित नोकरी सापडू शकते ही पण अगदी सोपी पद्धत आहे.या शिवाय आपल्या संबंधित व्यक्तीच्या ओळखीच्या माध्यमातूनही तुम्ही नोकरी साठी प्रयत्न करू शकता .

.......................................................................................................................................................................


 

नोकरी शोधण्याचे चार उत्तम मार्ग

यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रत्येक जण करतो ते तुम्ही देखील करा.
वेब साईट वर  ऑनलाईन नोकरी शोधा
नोकरी शोधण्यासाठी वेब साईटच्या नावांची यादी तयार करा जेथून तुम्ही नोकरी शोधू शकता.
वर्तमानपत्रात शोधा
स्थानिक वर्तमानपत्रांच्या जाहिरातींमध्ये शोधा. तुम्ही इम्प्लोयमेंट न्यूजच्या वेब संकेतस्थळावर प्रत्येक वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीची माहिती मिळवू शकता.
नोकरी देणा-या एजंसीमध्ये नाव नोंदवा
यलो पेजेसच्या मदतीने किंवा तुमच्या परिचयाच्या व्यक्तींकडून ही माहिती मिळवा. नजीकच्या एखाद्या प्लेसमेंट एजंन्सीची  माहिती मिळवा. तुम्हाला याचे आश्चर्य वाटेल की एखाद्याच्या ओळखीने कशाप्रकारे नोकरी मिळते.
नोकरी शोधण्यासाठी नेटवर्किंग कसे कराल याची माहिती मिळवा
नोकरी किंवा रोजगार मिळवण्यासाठी अधिक मदतीची आवश्यकता आहे का? तर इथे तुमच्या आवश्यकतेविषयी थोडीशी माहिती मिळवा. आम्ही त्यात मदत करण्याचा प्रयत्न करू.

.........................................................................................................................................................................


नोकरीसाठी अर्ज कसा करावा

नोकरीसाठी अर्ज करणे, हे नोकरी संदर्भातील महत्वाचे पाऊल आहे.    जीवनात आपण अनेक प्रकारचे अर्जाचे नमुने पाहिलेले, लिहिलेले असतात. परंतु चांगली नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करताना पुढील मुद्द्याची काळजी घेणे आपल्या अर्जामध्ये आवश्यक आहे.
प्रति
आपण नोकरीसाठी अर्ज कोणत्या संस्था, कंपनीत करत आहे. तेथील प्रमुख व्यक्तीचे नाव, पद, कंपनी हें अर्जाच्या डाव्या बाजूला सुरुवातीला असायला हवे. तसेच उजव्या कोपऱ्यामध्ये अर्ज करत असलेल्या दिवसाची दिनांक  लिहिणे आवश्यक आहे.
विषय
या मुद्द्यामध्ये प्रामुख्याने आपण कोणत्या पदाविषयी अर्ज करत आहोत, त्याविषयी माहिती द्यावी. उदा. व्यवस्थापक पदासाठी अर्ज..., उपसंपादक पदासाठी अर्ज... , इ. 
वरिष्ठाविषयी आदर
विषय या घटकानंतर आपण ज्या व्यक्तीला नोकरीसाठी अर्ज करत आहे, त्याविषयी आदरणीय महोदय, सप्रेम नमस्कार, असे आदरपूर्वक लिहावे.
स्वत:विषयी माहिती
यामध्ये आपले स्वत: चे पूर्ण नाव लिहावे. त्यानंतर आपण कोणत्या विषयात पदवी घेतली. ती कोणत्या विद्यापीठातून कोणत्या वर्षी घेतली आहे. याविषयी माहिती द्यावी. त्यानंतर सध्या आपण कोठे काम करत आहे, याविषयी माहिती द्यावी. तेथे केलेल्या कामाचा अनुभव याचा उल्लेख करावा. त्यानंतर आपली आवड / छंद याविषयी माहिती द्यावी. 
विनंती
आपल्याला नोकरीची गरज असल्याने शेवटी नोकरीच्या मागणीसाठी आदरपूर्वक विनंतीचा उल्लेख करावा. तसेच सोबत स्वत:ची व्यक्तिगत माहिती जोडत आहे, असा उल्लेख करावा. शेवटी डाव्या बाजूला कळावे, असा उल्लेख करावा.
स्वाक्षरी/सही
संपूर्ण अर्ज लिहून झाल्यानंतर अर्जाच्या शेवटी उजव्या बाजूला आपला आदरार्थी असे संबोधून  त्याखाली थोडी जागा सोडून आपली मराठीत अथवा इंग्रजीत स्वाक्षरी / सही करून त्याखाली पूर्ण नाव, दिनांक व ठिकाण लिहावे. 


...........................................................................................................................................................................


No comments:

Post a Comment