मुलाखतीची पूर्वतयारी
मुलाखतीला जाताना चांगली पूर्वतयारी करून जाणे आवश्यक आहे.
- मुलाखतीची पूर्वतयारी करताना आवश्यक मुद्दे
- कंपनीचा अभ्यास आणि संशोधन - तुम्ही ज्या कंपनीत नौकरीसाठी अर्ज केला आहे तिच्याबद्दल मिळेल ती सर्व माहिती गोळा करा. कंपनीच्या मिशन आणि विझन स्टेटमेंटचा अभ्यास करा. प्रोडक्ट डिस्क्रिप्शन, कंपनी पुरवत असलेल्या सेवा तेथील प्रमुख कर्मचारी इत्यादींचा अभ्यास करा. जर कंपनीत तुम्ही कोणाला ओळखत असाल तर त्याच्याकडून कंपनीच्या तातडीच्या गरजा - most pressing needs - काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कंपनीचे जर सोसिअल मिडिया पेज असेल तर ते पहा म्हणजे सद्यस्थितीत कंपनीत काय चालू आहे हे कळेल.
- मुलाखतीतील प्रश्नांचा सराव - कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत वा मित्रासोबत मुलाखतीत विचारल्या जाऊ शकणाऱ्या संभाव्य प्रश्नांचा सराव करावा. यामुळे नौकरी देणाऱ्याच्या दृष्टीकोनातून विचार करायला मदत होईल. मुलाखतीतील सामान्य प्रश्न हे तुमची बलस्थान आणि तुमच्या कमजोर जागा, कंपनीने तुम्हाला का नौकरी द्यावी आणि तुमची दीर्घकालीन व्यावसायिक उद्दिष्टे इत्यादींशी संबंधित असतात.
- तुमचा रेस्युम तयार करा - मुलाखतीपूर्वी तुमचा रेस्युम तयार करा. मुलाखत घेणाऱ्याकडे तुमचा जुना रेस्युम असू शकतो. त्याला तुमच्या बद्दलची अपडेटेड माहिती नव्या रेस्युममधून द्या. हा रेस्युम कंपनीच्या गरजेनुसार बनवलेला असावा. त्यातून तुम्ही त्या पदासाठी कसे योग्य उमेदवार आहात हे दिसून आले पाहिजे. मुलाखत घेणाऱ्याकडे सर्वप्रथम तुमचा रेस्युमच जातो. तो तुमचा राजदूतच आहे असे माना. तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवायचे कि नाही हे सुद्धा तुमचा रेस्युमच ठरवेल. तुमच्या बद्दलचे 'फर्स्ट इम्प्रेशन' तुमचा रेस्युमच निर्माण करत असतो म्हणून त्यावर विशेष काम करा. एक चांगला रेस्युम असण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
- वेळेचे नियोजन - वेळ पाळा. मुलाखतीसाठी वेळेवर हजार राहा. शक्यतोवर दहा पंधरा मिनिट तरी आधी जा. नोकरी देणारे आपल्या उमेदवारात 'वक्तशीरपणाची' अपेक्षा करतात. उशिरा जाण्याने त्यांच्या मनातील तुमच्या प्रतिमेवर खूपच विपरीत परिणाम पडू शकतो. ह्या चुकीची किंमत तुम्हाला नौकरी गमावण्याच्या रूपानेही चुकवावी लागू शकते.
अशाप्रकारे तयारी करून एखाद्या दक्ष
सैनिकाप्रमाणे मुलाखतीसाठी जा. मनाने रीलॅक्स आणि बुद्धीने तयार राहा. मग यश
तुमचेच आहे.
....................................................................................................................................................................
मुलाखतीचे शिष्टाचार
इतरांच्या मनातली तुमची प्रतिमा ही फक्त तुमच्या बोलण्यावरून
ठरत नसते. लहान सहन बाबतीतही तुम्ही पाळत असलेल्या किंवा पाळत
नसलेल्या शिष्टाचारांवरून ती ठरत असते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे
शिष्टाचार पाळले जातात. मुलाखतीत आणि कामाच्या ठिकाणी कोणते शिष्टाचार पाळावेत
याची थोडक्यात माहिती घेऊ.
मुलाखतीच्या वेळी -
- मुलाखतीची प्रक्रिया ही तुम्ही कंपनीच्या आवारात प्रवेश करताच सुरु झाली आहे असे समजावे. येथे प्रत्येकाशी सौजन्याने वागावे. तुम्हाला रिसेप्शन एरियात भेटलेली एखादी व्यक्तीच कदाचित तुमची मुलाखत घेईल. तुमचा नंबर येण्याची वाट पाहत असताना मासिके चालणे, फोनवर जास्त वेळ बोलत राहणे टाळा. यामुळे तुम्ही अधीर आहात आणि येथे बोर झाला आहात असा संदेश जातो. मुलाखतीच्या वेळी फोन लक्षकरून बंद करा किंवा साईलेंट मोडवर ठेवा. चुकून फोन चालू राहिल्यास व मधेच रिंग वाजल्यास लगेच फोन बंद करा आणि माफी मागा.
- मुलाखती साठी रुममध्ये जाताच सर्व मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींशी हस्तांदोलन करा. हस्तांदोलन करतांना तुमचे नाव सांगा. ओठांवर स्मितहास्य ठेवा. तुम्ही आधी रूममध्ये असाल तर मुलाखत घेणारी व्यक्ती रुममध्ये येताच उभे राहा आणि हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे करा.
- तुम्ही केबिनमध्ये जाण्याआधी मुलाखत घेणारे तेथे बसले असतील तर त्यांनी बस म्हटल्याशिवाय वा बसण्याची परवानगी घेतल्याशिवाय बसू नका. त्याच वेळी ते जर उभे राहिले असतील तर ते बसण्याआधीही बसू नका. कुठल्याही चहापानाला नम्रतेने नकार द्या. तुमचे समान तुमच्या खुर्चीखाली ठेवा.
- मुलाखतीला बसले असतांना आपले हात छातीवर फोल्ड करून बसू नका. पाय क्रोस करून बसू नका. ह्या गोष्टी तुम्ही घाबरत असल्याचे व तुम्हाला संरक्षणाची गरज असल्याचे दर्शवितात. त्या शारीरिक दुरावा निर्माण करतात व त्याचे रुपांतर मानसिक दुराव्यात होते.
- मुलाखत घेणारी व्यक्ती प्रश्न विचारात असतांना तिला मधेच अडवू नका.
- प्रश्नाचे उत्तर देतांना १-२ सेकंद थांबा. विचारपूर्वक उत्तर द्या. यातून प्रश्नकर्त्याप्रती आदरही दिसून येतो.
- मुलाखत संपल्यावर रूममधील प्रत्येकाशी हस्तांदोलन करण्यास विसरू नका. त्यांनी दिलेल्या वेळेबद्दल त्यांचे आभार माना.
- मुलाखतीमध्ये उत्तर देण्याचा सराव करा. तुमचा आवाज स्पष्ट आणि स्थिर असावा. त्यात अनावश्यक चाधुतर नसावेत. तुमच्या वागण्या बोलण्यातून आत्मविश्वास झलाकावा. समोरच्या व्याक्तीप्रतीही आदर दिसून यावा.
- मुलाखतीसाठी गेले असतांना रूममधील कुठल्याही वस्तूला हात लावू नका. तुमचे संपूर्ण लक्ष मुलाखातीवरच केंद्रित करा. इकडे तिकडे लक्ष देऊ नका. शांत राहा.
कामाच्या ठिकाणी पाळावयाचे शिष्टाचार -
- नेहमी चांगले, नीटनेटके, इस्त्री केलेले कपडे घालून कामावर जा.
- आपले व्यक्तिमत्त्व आनंदी ठेवा. उगीच चिडचिड करून कामाच्या ठिकाणचे वातावरण दुषित करू नका.
- ऑफिसमध्ये, फोनवर बोलतांना हळू आवाजात आवश्यक ठेवाढेच बोला. या बाबतीतले शिष्टाचार शिकून घ्या.
- काम सोडून, कामाच्या वेळात सहकाऱ्यांशी गप्पा मारत बसू नका.
- आपले काम प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित वेळेत पूर्ण करा. लक्षात ठेवा तुमचे कामच तुमची ओळख आहे.
- कोणाच्या माघारी त्याची टिंगल करणे , निंदा करणे इत्यादी प्रकार कटाक्षाने टाळा. यामुळे तुमचीच प्रतिमा डागाळेल.
लहान-सहान बाबींमध्ये तुम्ही पाळत
असलेले शिष्टाचार तुम्ही सभ्य आहात हे
सिद्ध करतात. यामुळे लोकांचा
तुमच्याप्रती आदर वाढतो. शिष्टाचार पालनात
कधीही आलास करू नका. एखादी चूक तुमची
नौकरी हिरावून घेऊ शकते आणि एखादा
चांगला शिष्टाचार तुम्हाला नौकरी किंवा
बढती मिळवून देऊ शकतो. म्हणूनच या
बाबी नीट समजून घ्या आणि आपल्या आचरणात
त्यांचा समावेश करा.
.................................................................................................................................................................
मुलाखतीवेळचा पोशाख
मुलाखतीसाठी किंवा प्रेझेन्टेशनसाठी अधिकाऱ्यांसमोर तुम्ही
जेव्हा जाता तेव्हा तुमचे 'फर्स्ट इम्प्रेशन'
हेच सर्वाधिक महत्त्वाचे असते. तुम्ही कसे दिसता आणि तुम्ही कसे कपडे घातले आहेत यावरून
समोरची व्यक्ती तुमच्याबद्दलचे मत बनवत असते. म्हणूनच स्वतःला प्रेझेंट करताना
पोषाखाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. व्यवस्थित शर्ट-पेंट घालून
मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवाराला एखाद्या जीन्स-टीशर्ट घालून आलेल्या उमेदवारापेक्षा
नक्कीच जास्त प्राधान्य दिले जाते. प्रसंगानुरूप पोशाख केल्याने आपली
सकारात्मक छाप इतरांवर पडते. आपण ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्यानुरूप
आपला पोशाख असावा. एखाद्या कंपनीत अधिकारी पदासाठीच्या मुलाखतीसाठी
तुम्ही जाणार असाल तर तुमचा पोशाखही सुट-पेंट असा असायला हवा.
स्वतःला प्रेझेंट करतांना पोशाख कसा
असावा:-
- आपण अर्ज करत असलेल्या पदाला शोभेल असा पोशाख करावा. उदा. जॉब पोझिशन हाई प्रोफाईल असेल, तर मुलाखतीला जाताना सुट वापरावा. तो हलक्या रंगाचा असावा. नेवीब्लू किंवा ग्रे. दृष्टीला आनंद देणाऱ्या रंगांचा पोशाखात समावेश असावा.
- पुर्ण हाताचा शर्ट म्हणजेच फुल स्लीव्सचा शर्ट.
- लेदर शूज
- डार्क सोक्स
- टाई
- बेल्ट
- केस नीट कापलेले, विंचरलेले असावेत.
- दाढी केलेली असावी.
- शरीरावर दागदागिने, अंगठ्या, लॉकेट इत्यादी नसावेत.
स्त्रियांचा पोशाख:-
- आवश्यकता (पदाची) असल्यास सुट
- अत्यंत मर्यादित प्रमाणात दागिने.
- प्रोफेशनल हेअरस्टाईल
- हलका मेकअप
- हलका परफ्युम
- पर्स नाही, पोर्टफ़ोलिओ किंवा ब्रीफकेस
- एका हातात एकापेक्षा जास्त अंगठ्या नसाव्यात.
सूचना :-
- मुलाखतीसाठी जाण्याचा विचारही करण्याआधी तुमच्याकडे चांगले कपडे आणि इतर आवश्यक साहित्य असल्याची खात्री करा.
- तुमचा संपूर्ण पोशाख व मुलाखतीसाठी लागणारे इतर साहित्य आधिच्या रात्रीच तयार ठेवा म्हणजे मुलाखतीच्या दिवशी तुमची धावपळ होणार नाही. शेवटच्या मिनिटासाठी कुठलेही काम ठेऊ नका.
- बूट पोलिश करून ठेवा. कपडे इस्त्री करून ठेवा.
चांगल्या पोशाखासाठी खर्च करणे म्हणजे
एक प्रकारची गुंतवणूकच आहे. ती
तुम्हाला खूप चांगला परतावा मिळवून देऊ
शकते. दोन चांगले ड्रेस, एक जोडी
चांगल्या प्रतीचे लेदर शूज, बेल्ट, टाई अशा वस्तूंवर दोन
चार हजार रुपये एकदा खर्च केल्यास तुम्हाला निदान वर्षभर तरी त्यांची चांगली
सेवा मिळेल. फक्त मुलाखातीसाठीच नाही तर प्रेझेन्टेशन देताना, मिटिंग, पार्टी ला जाताना एवढेच काय कामाच्या ठिकाणी नवीन लोकांशी ओळख/मैत्री करतांनाही
चांगला पोशाख तुमचे व्यक्तिमत्व नक्कीच खुलवेल.
मग चांगल्या पोशाखसाठी चांगली गुंतवणूक
करताय ना !
..................................................................................................................................................................
मुलाखतीसाठीचा चौफेर अभ्यास
आपली अभ्यासाची पुस्तके सोडून
आजुबाजूच्या घटकांविषयीचे ज्ञान व
त्यावर भाष्य करण्याची क्षमता अशी चौफेर
अभ्यासाची व्याख्या होऊ शकते.
कोणत्याही प्रकारच्या मुलाखतीसाठी
जाताना चौफेर अभ्यास असणे अतिशय महत्वाचे
आहे. यामध्ये उमेदवाराकडून त्याच्या
विषयातले सखोल ज्ञान तर अपेक्षितच
असते पण त्याचबरोबर सर्वसामान्य ज्ञान
असणे अपेक्षित आहे. त्यामध्ये साध्या
दैनंदिन गोष्टीं, राष्ट्रीय व
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा समावेश होतो.
चौफेर ज्ञान वाढवायचे कसे?
- जर तुम्ही मुलाखतीत तुमचा आवडता खेळ क्रिकेट असा सांगितला तर क्रिकेट मधल सखोल ज्ञान तुम्हाला असणे अपेक्षित आहे.
- तुम्ही कोणत्या प्रकारची व कुठल्या पदासाठी मुलाखत देत आहात हे तुम्हाला माहीत असावे.
- तुम्ही ज्या क्षेत्रात नोकरी करणार आहात,त्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व कंपन्या यांची माहिती हवी.
- तुम्ही राहता त्या ठिकाणची राजकीय , सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती असावी.
- तुम्ही राहता त्या ठिकाणची भौगोलिक,ऐतिहासिक वैशिष्ट्यांविषयी माहिती हवी.
- एखादा प्रसंग दिला असता तुम्ही कसे वागता किंवा कशा प्रकारची उत्तरे देता ते पहिले जाते.
- तुमची निरीक्षणशक्ती उत्तम असायला हवी.तुम्ही प्रसंगावधानी व हजरजबाबी असणे अपेक्षित आहे.
- तुमच्या क्षेत्रातल्या अद्ययावत बदलांची व घडामोडींची माहिती असावी.
या गोष्टी लक्षात आल्या तर मुलाखत
नक्कीच प्रभावी होईल.
No comments:
Post a Comment