Thursday, 6 June 2013

मुलाला शाळेत पाठवण्याची पूर्वतयारी

मुलाला शाळेत पाठवण्याची पूर्वतयारी


मुलाची शाळेत जाण्याची तयारी त्याच्या अगदी लहान वयातच करावी लागते. काही गोष्टींवर अधिक लक्ष देऊन मुलाची ही तयारी आपण करू शकता.
सामान्य ज्ञान
आपल्या मुलाला स्वत:चे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वाढदिवस या गोष्टी व्यवस्थित शिकवा. जेंव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेरच्या जगाविषयी काही प्रश्न विचारतात तेंव्हा त्या प्रश्नांची शक्य तेवढी योग्य उत्तरे द्या. किंवा त्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना अन्यप्रकारे मदत करा.
स्वयंसहायता
तुमच्या मुलाला स्वत:चे कपडे घालणे आणि बदलणे ही जमले पाहिजे. त्याला झिप, बटन्स, प्रेस बटन्स, वेल क्रो यांचा वापरही कळायला हवा. शाळेचे बूट ही त्यांचे त्यांनाच घालता आले पाहिजेत. आपले नाक साफ करणे आणि स्वच्छ्तालयात स्वत:हून जाणे या गोष्टीही त्याने स्वत:च केल्या पाहिजेत.
त्यांच्या वस्तूंना नावे द्या
तुमच्या मुलाच्या वस्तू, कपडे यांना व्यवस्थित खुणा करा. या खुणा ओळखून त्यांची जागा त्यांना कळू दे. याचा फायदा त्यांना आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यासाठी होईल. त्याला आपल्या वस्तूंची जबाबदारी ओळखायला शिकवा. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा तर वाचतोच शिवाय तुमची मुलं ब-याच चांगल्या सवयी शिकू शकतात.
मुलांचा आहार
मुलांचा सकाळचा नाश्ता आणि त्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी दिला गेलेला सकस आहार (टिफिन) यामुळे मुलांचा अभ्यास उत्तम होत असतो. जर तुमचा मुलगा जेवायला घरी येत असेल तर  गव्हाच्या चपाती, सँडवीच आणि एका फळाचा तुकडा त्याच्या साठी पुरेसा असतो. जर त्याची शाळा दुपारची असेल किंवा दुपारचे जेवण मिळणे अशक्य असेल अश्याप्रकारे शाळेची वेळ असेल तर एक ज्यादा सँडवीच त्याला द्यावे. त्यात थोडे दाणे, गाजर आणि काही भाज्या घालाव्यात. ‍पॉपकॉर्न, चिप्स आणि कोल्डड्रिंक्स पेक्षा चपाती, ‌‍‌सँडवीच आणि फळांचा रस हे किफायतशीर आणि आरोग्यदायीही असेल.

No comments:

Post a Comment