Thursday, 6 June 2013

बायो डेटा तयार करण्यासाठी

बायो डेटा तयार करण्यासाठी

स्व परिचय पत्र म्हणजे बायो डेटा होय. बायो डेटामध्ये आपली स्वतः ची वैयक्तिक माहिती असते. तो तयार करताना महत्वाच्या आणि सकारात्मक गोष्टींचा आणि शैक्षणिक बाबींचा उल्लेख प्रामुख्याने असावा. 
बायो डेटा (स्व-परिचय पत्र)तयार करण्यासाठी आपला बायो डेटा आकर्षक, सुटसुटीत कसा असेल याविषयी काळजी घेणे आवश्यक आहे. बायो डेटा मध्ये पुढील बाबींचा समावेश अत्यंत महत्वाचा आहे. 
वैयक्तिक माहिती
वैयक्तिक माहिती देताना आपले संपूर्ण नाव, कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता, सध्याचा पत्ता, जन्मतारीख, कोणकोणत्या भाषा येतात याविषयी संपूर्ण माहिती द्यावी.
शैक्षणिक माहिती
आपण कोणत्या विषया मध्ये पदवी, पदव्यूत्तर किंवा व्यावसायिक शिक्षण घेतले आहे. त्या विषयाचे नाव, किती टक्के आणि गुण मिळाले आणि कोणत्या विद्यापीठामधून पदवी घेतली आहे. याविषयाची माहिती द्यावी. उदा. साधारणता: १० वी, १२ वी, पदवी, पदव्यूत्तर पदवी, डिप्लोमा, याविषयाची माहिती द्यावी. तसेच सद्याच्या संगणक युगात वावरताना आपल्याला संगणका याविषयी माहिती द्यावी. यात मराठी, इंग्रजी टायपिंग, एम. एस. ऑफिस, पेजमेकर, कोरल,  मायक्रोसोफ्ट, फोटोशोप, यापैकी कोणते विषय आपल्याला येतात, याचा उल्लेख करावा.
छंद
प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या विषयाची आवड असते. कोणाला वाचन करायला आवडते. कोणाला ट्रेकिंग करणे,  कोणाला गाणी ऐकणे,  सिनेमा पाहणे, लिहिणे, पोहणे असे वेगवेगळ्या प्रकारची आवड असते. छंद या प्रकारात आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात. याविषयी योग्य क्रमाने लिहावे. उदा. ट्रेकिंग करणे, वाचन करणे. गाणी ऐकणे, खेळणे, पोहणे, इ.
कामाचा अनुभव
सध्या मी कोणत्या संस्थेत, कंपनीत काम करत आहे. याविषयी माहिती द्यावी. त्या संस्थेत, कंपनीत रुजू झाल्याचा दिनांक आणि कोणत्या पदावर काम करत आहे. याविषयी माहिती देऊन आपण कोणती जबाबदारी सांभाळत आहे व आतापर्यंत कोणत्या मोठ्या  प्रकल्पावर  काम  केले आहे ते सांगावे. तसेच यापूर्वी  कोणत्या ठिकाणी काम केले आहे. याविषयी माहिती द्यावी. प्रामुख्याने कामाचा कालावधी, जबाबदारी, पद, याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. 
इतर कला कौशल्य
शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना किंवा प्रत्यक्ष्यात काम करत असताना वेगळ्या प्रकारच्या काही स्पर्धामध्ये भाग घेतला असेल आणि त्यात विशेष प्राविण्य, पारितोषिक मिळाले असेल तर त्या विषयी थोडक्यात माहिती द्यावी. बायो डेटा तयार करताना प्रामुख्याने आपला बायोडेटा कमीत कमी शब्दात जास्तीत  जास्त  आशय  सांगणारा  असावा . त्यादृष्टीने मांडणे आवश्यक आहे. अशा प्रकारे बायोडेटा (स्व-परिचय पत्र) तयार करताना महत्त्वाच्या माहितीचा समावेश करावा.

..............................................................................................................................................................................



उत्तम बायो डेटा तयार करण्यासाठी टिप्स

बायोडेटा संक्षिप्त बनवा
सर्वात अलीकडच्या नोक-यांपासून सुरुवात करून जुन्या नोक-यांची यादी बनवा.प्रत्येक नोकरीविषयी मुलभूत माहिती लिहा: कंपनीचे नाव, तेथे काम केलेला काळ, पदनाम आणि पार पाडलेल्या जबाबदा-या यांचा समावेश करा.प्रत्येक ठिकाणी पार पाडलेल्या मोठया जबाबदा-याचा उल्लेख करा- उदा.‘सर्वोत्तम कामगार पुरस्कार असा गौरव’, ‘प्रतिदिन ६० कॉल्स हाताळले’, ‘संशोधन  यादी अबाधित  ठेवण्यासाठी जबाबदार.’ क्रियादर्शक शब्द वापरा- उदा. ‘Created’-‘निर्माण केले’, ‘managed’- ‘सांभाळले’, ‘ran’-‘चालवले’, ‘handled’-‘हाताळले’, ‘Answered’- ‘उत्तरदायी होतो’
बक्षिसांची यादी बनवा
शाळेतील अभ्यासविषयक, क्रीडा, मंडळ इ. मध्ये मिळवलेली बक्षिसे समाविष्ट करा. इतर अनुभवाचा समावेश- कामाविषयी पुरेसा अनुभव नसल्यास, इतर स्वयंसेवेचा अनुभव लिहा. बायोडेटा कसा बनवायचा अशा काही साईटस असतात यामधून माहिती मिळवा.
बायोडेटा पाठवण्यासाठी
स्वतःची ओळख करून देणारे आणि तुम्हाला त्या कंपनीसाठी काम करण्याची का इच्छा आहे हे स्पष्ट करणारे  कव्हर लेटर मालकाच्या नावे तयार करा.

........................................................................................................................................................................



बायोडेटा कसा असावा ?

 नोकरीच्या शोधात असताना सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात प्रभावशाली गोष्ट म्हणजे तुमचा बायोडेटा . त्यालाच सी.व्ही. किंवा रेझुमे असेही म्हणतात.
बायोडेटा म्हणजे आपली व्यावसायिक जाहिरात. ह्यामध्ये आपली आवश्यक ती वैयक्तिक व शैक्षणिक माहिती ह्यांचं समावेश असतो.
बायोडेटा च्या माध्यमातून ती व्यक्ती कशी आहे ह्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे ते चित्र अधिकाधिक प्रभावशाली बनवणे महत्वाचे ठरते.
बायोडेटा हा वेगवेगळ्या पदांप्रमाणे वेगवेगळ्या स्वरुपात लिहिता येतो. कित्येक वेळा उत्तम शैक्षणिक पार्श्वभूमी असूनही बायोडेटा नीट बनवता न आल्याने नोकरीची संधी हातून जाते.
त्यामुळे आकर्षक बायोडेटा बनवणे अत्यंत आवश्यक आहे.
  • चांगल्या बायोडेटा मध्ये असणारे महत्वाचे मुद्दे - 
  1. तुम्ही काय करू शकता ( तुमच्या क्षमता )
  2. तुम्ही काय काम केले आहे ( तुमचा कामाचा अनुभव )
  3. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या कामाचे ज्ञान आहे 
  4. तुम्ही कोण आहात 
  5. तुम्हाला कुठल्या प्रकारचे काम करायला आवडेल 
हे सर्व मुद्दे आपल्या बायोडेटा मध्ये असावेत.
बायोडेटा तयार करताना तो काही भागांमध्ये विभागलेला असावा. पुढे त्याचे काही भाग दिले आहेत -
  1. वैयक्तिक माहिती - नाव, पत्ता,फोन नंबर इत्यादी 
  2. नोकरीचा हेतू - आवडणाऱ्या कामाचे स्वरूप 
  3. शिक्षण - कोलेज चे नाव,पदवी आणि इतर कोर्स 
  4. कौशल्ये - इतर काही कौशल्ये जसे एखादी परदेशी भाषा येणे अथवा कॉम्पुटर शी निगडीत कौशल्ये
  5. अनुभव - आधी काही काम केले असेल तर त्याची माहिती 
  6. सांस्कृतिक माहिती - जर काही छंद  असेल तर त्यातले उल्लेखनीय माहिती 
  7. संदर्भ - काही त्या क्षेत्रातील ओळखीच्या व्यक्तींची माहिती 
 अशाप्रकारे जर बायोडेटा तयार केलं तर नक्कीच तो फायद्याचा ठरेल.



No comments:

Post a Comment