प्राथमिक शिक्षण

ज्या वयात काहीही कळत-समजत-उमजत नाही, त्याच काळात
प्राथमिक शिक्षणाला सुरुवात होते. लहान वयात शिक्षणाची आणि अभ्यासाची गोडी
लागावी. हा पालकांचा उद्देश असतो. बालवयात मुलांना स्वातंत्र्य दिले, तर
त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा अंदाज येतो.
प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी
पर्यंतचे शिक्षण होय. शिक्षणाची पद्धत साधी, सरळ, सोपी असते. लहान मुलांचे
हसणे, रडणे, गोड बोलणे, मस्ती करणे, खेळणे यांमधून शिक्षकांना विद्यार्थी
घडवायचा असतो. ‘शिस्त’ लावण्याची मुख्य जबाबदारी शिक्षकांवर असते.
महानगरपालिकेच्या आणि खासगी शाळांमधून प्राथमिक शिक्षणाची सर्वत्र उपलब्धता
आहे.
प्राथमिक शिक्षण ही विद्यार्थी शिक्षणाची पहिली पायरी आहे.
No comments:
Post a Comment