Thursday, 6 June 2013

मुलाखतीच्या वेळी


मुलाखतीच्या वेळी
ज्याप्रमाणे आपला बायो डेटा उत्तम असावा म्हणून तुम्ही प्रयत्न करता त्याचप्रमाणे मुलाखतीला जातानाही काही गोष्टींविषयी पूर्व तयारी अवश्य करावी.नोकरीसाठीच्या मुलाखतीत तुम्ही कंपनी किंवा व्यवस्थापकाला भेटता, ज्याद्वारे त्यांना तुमच्याबद्दल अधिक माहिती मिळू शकते. ही नोकरी तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे पडताळून पाहण्याची संधी कंपनीला यातून मिळते. अशा मुलाखतींमधून मालक कोणाला नोकरी द्यावी याचा निर्णय घेतात. 
उत्तम मुलाखतीसाठी काय करावे
मुलाखत उत्तमरीत्या पार कशी पाडावी याविषयीच्या टिप्ससाठी काही साईटसचा आधार घ्या. 
काय विचारले जाईल
मुलाखती मध्ये साधारण कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याची यादी तयार करा नंतर त्या प्रश्नांची उत्तरे आपण योग्य प्रकारे देऊ शकतो का याचा निट विचार करून आपल्या मित्राला किंवा आपल्या घरातल्याच एखाद्याला प्रश्न विचारण्यास सांगून मुलाखतीचा सराव करावा. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मुलाखतीच्या वेळी तुम्ही घाबरून जाणार नाही.कोणत्याही मुलाखतीत काही विशेष प्रश्न बहुदा विचारले जातात. कंपनी किंवा व्यवस्थापक किंवा मुलाखतकार काही बेकायदेशीर प्रश्नही विचारू शकतात परंतु तुम्ही त्यांना उत्तर देणे बांधील नाही. उदा. तुम्ही एच.आय.व्ही संक्रमित आहात का? असे विचारता तुमची तब्येत उत्तम आहे का असे विचारले जाऊ शकते. 
ठरलेले प्रश्न
ठरलेले प्रश्न पाहण्यासाठी काय विचारले जाऊ शकते आणि त्याचे उत्तर कसे द्यावे हे जाणण्यासाठी काही साईटसचा आधार घ्या. ज्यामधील माहिती तुमच्या संदर्भासाठी उपयुक्त ठरेल.

.....................................................................................................................................................................


मुलाखतीच्या वेळचे संवाद कौशल्य
एखादी नोकरी मिळवायची तर उमेदवाराला स्वत:ला वेगवेगळ्या पातळ्यांवर सिद्ध करावे लागते. त्यात अंतिम टप्पा असतो मुलाखतीचा. मुलाखतीत उमेदवाराने स्वत:ला सिद्ध केले, तर पुढचा प्रवास सुकर ठरतो. मुलाखतीच्या वेळी व्यक्ती स्वतःला व स्वतःच्या ज्ञानाला कशा प्रकारे सादर करते यावर मुलाखतीचे यश अवलंबून असते. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीसोबत किंवा संपूर्ण पॅनलसोबत सकारात्मक आणि आत्मविश्वासपूर्ण संवाद साधला जाणे अत्यंत गरजेचे असते.    
मुलाखतीचे एक महत्वाचे अंग म्हणूनच संवादकौशल्याकडे पहिले जाते. मुलाखतीद्वारे तुम्ही किती उत्तम संवाद साधू शकता आणि देहबोली कशी वापरता याची चाचपणी होते. तुमची बोलण्याची पध्दत, स्पष्ट उच्चार तसेच मुलाखत इंग्रजी भाषेत असेल तर या भाषेवरील तुमची पकड या गोष्टींकडे बारकाईने पाहिले जाते.
मुलाखत प्रभावी होण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी :
  •  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विचारलेल्या प्रश्नांची नेमकी उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा. जर विचारण्यात आले तरच पुढील तपशील द्यावा.
  •  उत्तरे देताना आपल्याला किती माहित आहे हे दाखवण्याचा अट्टाहास नसावा. उत्तरे आत्मविश्वासाने व स्पष्ट आवाजात द्यावीत.
  •  एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसल्यास तसे सांगावे, उगाच खोटे बोलू नये.
  •  प्रश्न नीट ऐकून घ्यावा.
  •  उत्तरे देताना नजर प्रश्नकर्त्याकडे असावी.
  •  मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींना गुड मॅार्निंग अथवा गुड डे अशा शुभेच्छा द्याव्यात.
  •  जर हातमिळवणी केली, तर ती आत्मविश्वासाने करावी.
  •  जमिनीकडे पाहून, छताकडे पाहून, पाय डोलवत, खिशात हात घालून बोलणे टाळावे. कारण आपल्या व्यक्तिमत्वाची पारख आपल्या देहबोलीवरून ठरते.
  •  उत्तरे शक्यतो नकारात्मक नसावीत. 
  •  मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींना शेवटी धन्यवाद म्हणायला विसरू नका.
  •  एखादा प्रश्न समजला नसेल तर प्रश्न पुन्हा सांगण्याची विनंती करावी. 
या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपली मुलाखत नक्कीच छान होईल.

.......................................................................................................................................................


भाषेचे ज्ञान
भाषेवरील आपले प्रभुत्व हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. योग्यवेळी योग्य शब्दांद्वारे आपल्या भावना व्यक्त करता येण्यासाठी भाषा चांगली अवगत असणे आवश्यक आहे. शब्दांमध्ये खूप मोठी शक्ती सामावलेली आहे. ज्याला शब्दांचा योग्य वापर करता येतो तो श्रोत्यांच्या हृदयापर्यंत सहज पोहचू शकतो. भाषेचा वापर करतांना दोन प्रकारच्या भाषा वापरण्याचा प्रसंग आपल्यावर येऊ शकतो. एकतर मातृभाषा आणि दुसरी आपण शिकलेली भाषा. भाषेचा वापर करताना योग्य काळजी घेतली तर आपण यशस्वी होऊ शकतो.  
भाषेचे ज्ञान वाढण्यासाठी...
  • आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजेल अशाप्रकारची आपली भाषा असावी. अर्वाच्य भाषेचा वापर करू नका. अशा बोलण्याने तुम्ही अशिक्षित आणि उद्धट असल्याची छाप पडते. बोलतांना शांतपणे आणि समजून बोलावे. 
  • शब्दांचा उच्चार स्पष्ट करा. ओझरता उच्चार केल्यास किंवा बोलतांना तुमची जीभ व ओंठ पुरेसे न हलवल्यास तुम्ही आळशी असल्याचे लोक मानतील व तुमचे म्हणणे त्यांना नीट  समजणारही नाही. 
  • खूप वाचन करा. वेगवेगळ्या प्रकारचे वाचन करा. यामुळे तुमचा शब्दसाठा वाढेल आणि वेगवेगळ्या वाक्यरचना समजून घेण्यास मदत होईल. भरपूर वाचनाने तुम्ही बरेच नवे वाक्प्रचारही शिकू शकाल. अवधड शब्दांवर प्रभुत्व मिळवू शकाल. 
  • ज्या शब्दांच्या अर्थ आणि उच्चार यांबद्दल तुम्ही साशंक आहात त्यांचा वापर टाळा. त्यांच्या वापरणे तुमच्या बोलण्याचा एकदम गैरार्थ निघू शकतो. आणि चुकीच्या पद्धतीने शब्दांचा वापर केल्यास लोकांचा तुमच्या बुद्धीमात्तेवरील व तुमच्या क्षमतांवरील विश्वास कमी होऊ शकतो. 
विविध भाषेचे ज्ञान आणि सुधारणा 
  • मातृभाषेव्यतिरिक्त भाषेत बोलण्याचा प्रसंग आल्यास आपले सर्वोत्तम ज्ञान पणाला लावावे. आजकाल बऱ्याचवेळेस मुलाखती इंग्रजीतून घेतल्या जातात. इंग्रजी येत नसलेली व्यक्ती कितीही हुशार आणि कुशल असली तरी ती आवश्यक भाषा येत नसल्याने मागे पाडते. तिच्या त्याच्या प्रगतीत अनेक अडचणी येतात. म्हणूनच इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
  • मातृभाषेव्यतिरिक्तच्या भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी सततच्या आणि विशेष प्रयत्नांची आवश्यकता असते.यात तुमचा शब्दसाठा वाढवणे,व्याकरणाचे ज्ञान वाढवणे, योग्य उच्चार शिकणे इत्यादी समाविष्ट आहेत.भाषा शिकण्यासाठी ती ज्यांची मातृभाषा आहे त्यांच्यात राहणे, त्यांच्याशी बोलणे ही सर्वोत्तम पद्धत आहे.परंतु काही कारणास्तव असे करणे शक्य नसल्यास त्या भाषेचा जास्तीत जास्त संपर्क कसा करता येईल याचा विचार करावा.त्या भाषेतून गाणी ऐकणे, रेडियो ऐकणे, टि.व्ही.प्रोग्राम पाहणे असे उपायही करता येतील. 
  • वाचन हा भाषा समृद्धीचा राजमार्ग आहे. शक्य तितके वाचा. वर्तमानपत्र, मेगेझीन, पुस्तके इत्यादी वाचा. चौफेर वाचनाचे अनेक फायदे आहेत. 
  • इतर लोक ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही तरीही ते चांगली इंग्रजी बोलतात त्यांचे बोलणे ऐका. त्यानुसार बोलण्याचा सराव करा. त्यांनी आपली भाषा सुधारण्यासाठी काय उपाय केले ते विचार आणि त्यानुसार प्रयत्न करा. 
  • व्याकरणाचा पुरेसा अभ्यास करा परंतु त्यातच गुंतून जाऊ नका. इंग्रजीचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी त्यांचा पूर्ण वेळ व्याकरणाची चिंता करण्यातच घालवतात व भाषेची इतर कौशल्ये जसे शब्दसाठा, योग्य उच्चारल, योग्य प्रकारे ऐकणे आणि बोलणे इत्यादी शिकायचे राहूनच जाते. 
  • तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना तुमच्या चुका निदर्शनास आणून द्यावयास सांगा. 
  • लक्षात ठेवा तुमचा मुल उद्देश तुम्हाला जे म्हणायचे आहे ते तसेच लोकांपर्यंत सहजपणे पोहचवणे हा असतो. मातृभाषेव्यतिरिक्तच्या भाषेतून तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुमच्याकडून चुका होणे अपेक्षित असते परंतु लोक त्याकडे तोपर्यंत लक्ष देत नाहीत जो पर्यंत तुम्हाला काय म्हणायचे आहे ते त्यांना समजते. जर तुम्ही अगदी 'परफेक्ट' होण्यासाठी काळजी करीत असाल आणि छोट्या छोट्या चुकांवर खूप लक्ष देत असाल तुम्ही गोंधळून जाल, तुम्ही खूपच हळू बोलाल व तुम्हाला समाजाने लोकांना अवघड होईल आणि त्यांना वाटेल कि तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे.  
म्हणूनच भाषेवर प्रभुत्व मिळवा, शब्दांना आपले सारथी बनवा. मग प्रगतीचे प्रत्येक पाऊल पुढे पडेल.  

..............................................................................................................................................................

मुलाखतवेळची देहबोली
आपले हृदय छातीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडू पाहत आहे, कपाळावरून घामाचे थेंब ओघळत आहेत आणि तुमचे मन अगदी सैरावैरा धावत आहे - ही स्थिती काही कडाक्याच्या भांडणाची किंवा युद्धप्रसंगाची नाही - ही फक्त एक नोकरी सततची मुलाखत आहे. जॉब इंटरव्यूह हा बऱ्यापैकी तणाव निर्माण करणारा असतो हे काही रहस्य नाही. परंतु आपल्यापैकी खूप सारे लोक आपण काय बोलणार, कसे बोलणार याबाबत चिंता करण्यातच बराच वेळ घालवता आणि ही चिंता त्यांच्या देहबोलीतून स्पष्टपणे दिसून येते.
"तुम्ही काय आणि कसे बोलता हे जास्त महत्त्वाचे ठरत असते." म्हणूनच मुलाखतीच्या वेळी तुम्ही शब्दांद्वारेच नाही तर शब्दांविनाही तुमचे प्रोफेशनलीझम प्रभावीपणे व्यक्त करायला हवे. 
मुलाखतीला जाण्याआधी कंपनीविषयी माहिती वाचून ठेवा. तिची वर्तमान स्तिथी समजून घ्या. मुलाखतीतील नेहमी विचारल्या जाणाऱ्या काही सामान्य प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची याचा सराव तुम्ही केलेला असावा.  
सुरुवातीचे ३० सेकंद हे अत्यंत महत्त्वाचे असतात. बरेच मॅनेजर हे संभाव्य उमेदवार याच वेळेत ओळखून घेतात. केबिनमध्ये जाताना आपली टाय वगैरे एडजस्ट करू नका किंवा शर्ट इन नीट करण्याच्या भानगडीतही पडू नका. हे सर्व आधीच व्यवस्थित करून घ्या. 
'डेडफिश हेंडशेक' टाळा. हात मिळवतांना तो पूर्ण आत्मविश्वासाने मिळवा.  मजबूत हस्तांदोलन आत्मविश्वासाचे आणि शक्तीचे द्योतक असते. परंतु याचवेळी ही काही शक्तिप्रदर्शनाची  जागा नाही हे ही लक्षात ठेवा. आपल्या इंटरव्ह्यूअरच्या इच्छेएवढा वेळच  शेकहेंड असावा. कमजोर हस्तांदोलन भीती आणि अनिश्चितता दर्शवितो. समोरच्या व्यक्तीशी हस्तांदोलन करतांना त्याच्या डोळ्यात बघा आणि हेलो म्हणा. आणि हो स्माईल करणे कधीच विसरू नका. मंदस्मित वातावरणातील तणाव निवळण्यास मदत करते. 
  • देहबोली 
  • आपल्या खुर्चीत सरळ बसा. तुमच्या शरीराचा कल थोडासा पुढे झुकलेला असावा. यामुळे तुम्ही जागरूक आहात आणि संभाषणात इंटरेस्टेड आहात असे दिसून येईल. 
  • तुमचा उत्साह आणि आवड त्यांना दिसू द्या. सकारात्मकरीत्या मन हलवणे आणि इतर हावभावद्वारेर ते व्यक्त करता येतात. परंतु या क्रिया मर्यादित असाव्यात अन्यथा आपले हसू होईल. 
  • तुमच्यात आणि मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीत योग्य तितके अंतर असावे. 'पर्सनल स्पेस' मध्ये अतिक्रमण केल्यास ते समोरच्या व्यक्तीला विचलित करू शकते.
  • परफ्युम इत्यादीचा कमीतकमी वापर करावा. 'डोकेदुखी' देणारा उमेदवार ही ओळख तुमच्या काही फायद्याची नाही.
  • जर एकापेक्षा जास्त जण तुमचा इंटरव्ह्यू घेत असतील तर प्रत्येकाशी नजर मिळवा आणि शेवटी ज्याने प्रश्न विचारला आहे त्याच्याशी नजर मिळवत आपले उत्तर संपवा.
  • छातीवर हातांची घडी घालू नका. पाय क्रोस करून बसू नका. यामुळे तुम्ही घाबरलेले आहात आणि संरक्षण इच्छिता असा संदेश जातो. 
  • मुलाखत संपल्यावर उभे राहा आणि स्मितहास्य करा.  आनंदाने निरोप घ्या.
तुमच्या मुलाखतीतील काही चांगल्या प्रश्नोत्तरांनंतर जवळपास संपते परंतु अजून रीलेक्स होऊ नका.  तुमचा इंटरव्ह्यू हा तुम्ही कंपनीच्या आवारात शिरताच सुरु होऊ शकतो आणि तो तुम्ही त्या आवारातून बाहेर पडे पर्यंतही चालू राहू शकतो हे लक्षात ठेवा. एखाद्या अनोळखी, अचानक भेटलेल्या व्यक्तीशी बेजबाबदार वागणूक किंवा एखादी बेजाबदार कृती तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवू शकते. म्हणूनच Always be prepared... 

....................................................................................................................................................................
मुलाखती वेळच्या वर्तमान घडामोडी
 आपल्या सभोवतालच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात काय घडते याची माहिती वर्तमान घडामोडींमध्ये असते. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी वर्तमान घडामोडींची अद्यावत  माहिती ठेवणे अपेक्षित आहे. ही माहिती सर्वच क्षेत्रातल्या लोकांना उपयुक्त ठरते. त्यासाठी दररोज कमीत कमी एकतरी वर्तमानपत्र वाचणे व त्यातील महत्वाच्या बातम्यांची नोंद घेणे आवश्यक आहे. 
उमेदवाराला त्याच्या आजुबाजूच्या परिस्थितीचे कितपत ज्ञान आहे. सामाजिक व आर्थिक राजकीय प्रश्नांची कितपत जाण हे मुलाखतीत तपासले जाते. सामान्य ज्ञान हा विषयही त्यातलाच आणि उमेदवाराची त्यावर मजबूत पकड असणे अपेक्षित आहे. वर्तमानविषयक घडामोडींची अद्यावत माहिती वर्तमानपत्रे,  मासिके, टी.व्ही ,रेडियो ह्याद्वारे मिळू शकते. उमेदवाराचे सामान्य ज्ञान  व वर्तमान घडामोडींचे ज्ञान त्याबरोबरच त्यावर भाष्य करण्याची क्षमताही तपासली जाते.अशा विषयातले ज्ञान उमेदवारासाठी फायद्याचे ठरते. जास्तीत जास्त वर्तमान घडामोडींवरच प्रश्न मुलाखतीत विचारले जातात.
उदा. पुण्यातल्या अवैध बांधकामांचा आकडा वाढलाअशी बातमी असेल तर तुम्ही ही समस्या कशी सोडवाल असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. वर्तमान घडामोडी म्हणजे फक्त राजकीय किंवा क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडी नव्हेत, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि जागतिक दर्जाच्या महत्वाच्या घडामोडीही माहित असायला हव्यात. तर मग, तयार आहात ना मुलाखतीसाठी

...............................................................................................................................................................





No comments:

Post a Comment