>> वाटा करिअरच्या <<
१० वी नंतरचा अकरावी आणि बारावीचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा आहे. १२ वीपर्यंतचं शिक्षण हे शालेय विभागात गणलं जातं. युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमांना बारावीनंतर प्रवेश दिले जातात. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना काही विशिष्ट विषय बारावीत विद्यार्थ्यांनी घेणं हे आवश्यक असतं. हे विषय नसल्यास संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाही म्हणूनच ११ वीच्या प्रवेशाच्या वेळी विषयांची निवड योग्य पध्दतीने करावी.
काही व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्यासाठी बारावीला आवश्यक असणारे विषय आहेत ते असे..
आर्किटेक्चर , अॅक्चुरिअल सायन्स , बी.एस्सी.(आय.टी.) - बारावी कोणत्याही शाखेतून केली तरी चालेल. पण गणित विषय घेणं आवश्यक आहे.
इंजिनीअरिंग , मर्चंट नेव्ही , एन.डी.ए.( हवाईदल आणि नौदल प्रवेशासाठी) , अॅग्री इंजिनीअरिंग - बारावी विज्ञानशाखेतून भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र आणि गणित विषय घेणं आवश्यक आहे.
मेडिकल अभ्यासक्रम , पॅरामेडिकल अभ्यासक्रम , पशुवैद्यकीय अभ्यासक्रम , फिशरीज सायन्स , ऑप्टोमेट्री , डेंटल मेकॅनिक - बारावी विज्ञानशाखेतून भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषय घेणं आवश्यक आहे.
कृषी विद्यापीठातले अभ्यासक्रम आणि बी.एस्सी.(बायोटेक्नोलॉजी) साठी बारावी विज्ञानशाखेतून भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , गणित आणि जीवशास्त्र विषय आवश्यक आहेत.
फार्मसी पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र या विषयासोबत गणित किंवा जीवशास्त्र विषय घेणं आवश्यक आहे.
पदवीला मानसशास्त्र विषय घ्यायचा असेल तर अकरावीलाच मानसशास्त्र विषय घेणं उपयुक्त ठरतं.
फाइन आर्टसच्या पदवीला प्रवेश देताना चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेतल्या ग्रेडनुसार १० पैकी गुण दिले जातात. (ए ग्रेड - १० गुण , बी ग्रेड - ६ गुण , सी ग्रेड - ४ गुण) त्यामुळे फाइन आर्टसला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेत इंटरमिजीएटची परीक्षा दिली नसेल तर अकरावीला असताना इंटरमिजिएट परीक्षा देणं उपयुक्त ठरेल.
कृषी विद्यापीठातल्या अभ्यासक्रमांनाही बारावीच्या गुणांनुसारच प्रवेश दिले जातात. तसेच आर्किटेक्चर आणि इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १२ वी बोर्डाच्या परीक्षेतल्या गुणांना राज्यात ५० टक्के वेटेज असल्याने १२ वीच्या परीक्षेकडे गांभीर्याने पहाणं आवश्यक आहे.
फाईन आर्टसमध्ये पदवी शिक्षणासाठी (बॅचलर ऑफ फाईन आर्टस) बारावीनंतर प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. दहावीनंतरच फाईन आर्टच्या अभ्यासक्रमाला जायचे असल्यास एक वर्षांच्या ' फाऊंडेशन ' अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.
फाऊंडेशनसाठी चित्रकलेची इंटरमीजिएट परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. कला महाविद्यालयामध्ये फाऊंडेशन अभ्यासक्रम उपलब्ध असतो. फाऊंडेशन कोर्सनंतर जी.डी. आर्ट (गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्टस) या चार वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) , चित्रकला , शिल्पकला , टेक्स्टाइल डिझायनिंग यामध्ये स्पेशलायझेशन करता येईल. जी. डी. आर्ट अभ्यासक्रम बी.एफ.ए. (बॅचलर इन फाइन आर्टस) अभ्यासक्रमाच्या समकक्ष मानले जातात.
अभ्यासक्रमानंतर सेट डिझायनिंग , ग्राफिक डिझायनिंग , अॅनिमेशन , थ्रीडी. अॅनिमेशन , आर्ट डिटेक्शन यांसारख्या क्षेत्रात करिअर करता येईल.दहावीनंतर कला महाविद्यालयात छायाचित्रणाचेदेखील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
फाऊंडेशन आणि जी.डी.आर्ट कॉलेज
एल.एस.रहेजा कॉलेज ऑफ आर्टस् , वांद्रे
बी.के.सोमाणी पॉलिटेक्निक , सोफिया कॉलेज कॅम्पस , भुलाभाई देसाई मार्ग , मुंबई.
११ वी व १२ वी स्तरावरील किमान कौशल्यावर आधारीत अभ्यासक्रमाला आता व्यवसाय (व्होकेशनल) अभ्यासक्रम म्हणून ओळखलं जातं. पारंपारिक कला , विज्ञान व वाणिज्य शाखेमधून पुस्तकी ज्ञान घेऊ न इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. या अभ्यासक्रमामध्ये ७० टक्के भाग हा व्यावसायिक विषयावर तसंच प्रात्यक्षिकावर आधारीत आहे.
विविध ज्युनियर कॉलेजांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध असून यासाठी प्रवेश ऑफलाईन दिले जातात. (म्हणजेच थेट कॉलेजातून प्रवेश अर्ज घेणं आवश्यक आहे.)
हा अभ्यासक्रम ६ गटांमध्ये विभागलेला आहे.
इंजिनीअरिंग गट - मेटेंनन्स व रिपेअरिंग ऑफ इलेक्ट्रीकल अप्लायन्सेस , बिल्डींग मेटेंनन्स , कॉम्प्युटर मेटेंनन्स , मल्टी मिडीया इंटरनेट टेक्नोलॉजी , इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी , मेकॅनिकल टेक्नॉलॉजी , ऑटो इंजिनीअरिंग टेक्निशियन , रिपेअर्स मेटेंनन्स व रिवाईंडिंग ऑफ इलेक्ट्रीकल मोटर्स
कॉमर्स गट - पर्चेसिंग व स्टोअर किपिंग , मार्केटिंग व सेल्समनशिप , अकाऊंटिंग अॅण्ड ऑडिटिंग , ऑफिस मॅनेजमेंट , इन्शुरन्स , बँकिंग
मत्स्य गट - मत्स्य प्रक्रिया तंत्र , मत्स्य उत्पादक
कृषी गट - हॉर्टिकल्चर , क्रॉप सायन्स , डेअरी टेक्नोलॉजी , पोल्ट्री प्रॉडक्शन , सीड प्रॉडक्शन टेक्नॉलॉजी , वॉटर शेड मॅनेजमेंट , पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी ,
आरोग्य व वैद्यकीय सेवा गट - क्रेच व प्री स्कूल मॅनेजमेंट , ऑप्थॅल्मिक टेक्निशियन , एक्स रे टेक्निशियन , मेडिकल लॅब टेक्निशियन ,
गृहविज्ञान गट - ट्रॅव्हल अॅण्ड टूरिझम , बेकरी व कन्फेक्शनरी , कुकरी
१२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल सहाय्य योजनेअंतर्गत सरकारकडून सुलभ अर्थसहाय्य
कारखान्यांमध्ये १ वर्ष उमेदवारी करण्याची संधी.
१२ वीला ६० टक्के गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश
उच्च शिक्षणाकडे जायचं असल्यास बीए , बीकॉमच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेऊ शकता. तसंच हॉटेल मॅनेजमेंट पदवी/पदविका अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकता.
१२वी नंतर काही वर्ष एखाद्या कारखान्यामध्ये नोकरी केल्यावर स्वत:चा व्यवसाय करून चांगलं उत्पन्न मिळवता येईल.
- अकरावीमध्ये विषय निवडताना..

- फाईन आर्टस संबंधित अभ्यासक्रम

- ११ वी व्यवसाय शाखा (एम.सी.व्ही.सी.)

- १२ वी व्यवसाय अभ्यासक्रमानंतरील संधी
१२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सुशिक्षित बेरोजगारांसाठी बीज भांडवल सहाय्य योजनेअंतर्गत सरकारकडून सुलभ अर्थसहाय्य
कारखान्यांमध्ये १ वर्ष उमेदवारी करण्याची संधी.
१२ वीला ६० टक्के गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांना डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश
उच्च शिक्षणाकडे जायचं असल्यास बीए , बीकॉमच्या पहिल्या वर्षी प्रवेश घेऊ शकता. तसंच हॉटेल मॅनेजमेंट पदवी/पदविका अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकता.
१२वी नंतर काही वर्ष एखाद्या कारखान्यामध्ये नोकरी केल्यावर स्वत:चा व्यवसाय करून चांगलं उत्पन्न मिळवता येईल.
No comments:
Post a Comment